मराठी अर्थशात्र परिषद



मराठी अर्थशात्र परिषद

(सोसायटीज रजिस्टेशन ॲक्ट १८६० आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५०)
स्थापना : दि.९ जानेवारी १९७७

परिषदेच्या उद्देशाशी सुसंगत व पोषक असे अन्य कार्यक्रम हाती घेणे, परिषद आपले कार्यक्रम पार पाडतांना जातपात, धर्म, पंथ, लिंग यासारखा व अन्य कोणताही भेदभाव करणार नाही .

  • आजीव सदस्य संख्या : १८९०
  • नियतकालिक : 'अर्थसंवाद' (त्रैमासिक)
  • कार्यक्षेत्र : संपूर्ण भारतभर मराठीतून अर्थशास्त्राचे अभ्यासक
  • संस्थापक अध्यक्ष : प्रा.नी. वि. सोवनी
  • पत्रपंडित पां. वा. गाडगीळ उपक्रम
  • जमनालाल बजाज स्मृती उपक्रम
  • डॉ. सुधा मोकाशी पुरस्कृत
  • टिळक महाराष्ट्र व्याख्यान *पारितोषिके*
  • आनंद भडकमकर स्मृती प्रतिष्ठान सिकॉम लि.चें घारितोषिक प्राप्त अर्थसंवाद'
  • चाळीस माजी अध्यक्ष यांचा अध्यक्षीय भाषणाचे 'अर्थविचार' खंड-१ व खंड- २
  • प्रा.नी. वि. सोवती स्मृती व्याख्यान
  • माजी अध्यक्षांचे गौरवार्थ व्याख्यान
  • डॉ. शंकर मोडक पुरस्कृत व्याख्यान
  • धुळे व्याख्यानमाला
  • भारतीयार्जीत नोबेल पुरस्कार स्मृती परिसंवाद
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथ पारितोषिक


मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या कार्यालयाचे
औरंगाबाद येथे उद्घाटन

मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्यालय परिषदेच्या स्वतःच्या वास्तूत व्हावे ही परिषदेच्या आजीव सभासदांची अनेक वर्षापासूनची इच्छा होती. यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात वास्तू खरेदीच्या दृष्टीने प्रयत्नही करण्यात आले, परंतु त्या त्या वेळच्या अनेक अडचणीमुळे परिषदेची वास्तू करण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाऊ शकले नाही. परिषदेच्या आजीव सभासदांनी, सर्व माजी अध्यक्षांनी, आजपर्यतच्या सर्व विश्वस्तांनी, सर्व माजी कार्याध्यक्षांनी, सर्व माजी कार्यवाह-खाजीनदारांनी, आजपर्यतच्या सर्व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या प्रयत्नाची फलश्रुती म्हणजे औरंगाबाद येथे संपन्न झालेला परिषदेच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा होय.


दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. आर.बी. भांडवलकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी अध्यक्षाच्या हस्ते फीत कापून वास्तूत प्रवेश करण्यात आला व परिषदेच्या कोनशिलेचे अनावरण करून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेच्या वास्तू स्वप्नपूर्तीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होता.




व्याख्यानमाला

धुळे


वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ संचलित कला, वाणिज्य व बी.सी.ए. महिला महाविद्यालय, देवपूर, धुळे येथे अर्थशास्त्र विभाग व मराठी अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३/१/२०२४ शनिवार रोजी सकाळी १०.०० वाजता व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. व्याख्यानमालेस प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अविनाश निकम (कार्याध्यक्ष म.अ.प.) व प्रमुख वक्ते श्री. विष्णूकांत फाफट (संचालक- बोस्टन इन्स्टीट्यूट, धुळे ), प्रा. जे. डी. तलवारे, प्रा. मोहन पावरा यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करुन व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.झेड. चौधरी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्विकारले. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. के. शिंदे यांनी प्रास्तविक केले. प्रास्तविकात त्यांनी मराठी अर्थशास्त्र विषयाच्या विकासातील म.अ.प. चे योगदान याबद्दल सविस्तर माहिती दिली.



कार्यकारी मंडळ
२०२२-२०२३

प्रो. (डॉ.) अनिलकुमार वावरे

प्रो. (डॉ.) अनिलकुमार
वावरे

अध्यक्ष - मराठी अर्थशास्त्र परिषद

मराठी अर्थशास्त्र परिषदेने अगदी तिच्या स्थापनेपासूनच अर्थशास्त्रीय लेखन, संशोधन व साहित्यनिर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अर्थसंवाद सारखा त्रै-मासिक अंक, वार्षिक अधिवेशानांची स्मरणिका, विविध ग्रंथांचे प्रकाशन व नवोदित लेखक व संशोधकांना नानाविध पुरस्कार व सन्मान देऊन गौरविले जाते.



डॉ. अविनाश रामलाल निकम

डॉ. अविनाश रामलाल निकम

कार्याध्यक्ष

मराठी अर्थशास्त्र परिषद ही महाराष्ट्र आणि ज्या ठिकाणी मराठी भाषीक आहेत अशा पातळीवर गेली ४५ वर्ष निरंतर कार्य करणारी शैक्षणिक, प्रबोधनात्मक व संशोधनात्मक संस्था आहे.विविध आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करणाऱ्या सभासदांसाठी तसेच नागरिकांसाठी वार्षिक अधिवेशने, भाषणे आणि चर्चासत्रे आयोजित केली आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक विशेषतः

डॉ. मारोती विरभद्र तेगमपुरे

डॉ. मारोती विरभद्र तेगमपुरे

कार्यवाह-खजिनदार

मराठी अर्थशास्त्र परिषदेचे मराठी अर्थशास्त्र परिषदेचे संकेतस्थळ विकसित होत आहे. याचा परिषदेचा कार्यवाह-खजिनदार म्हणून मनस्वी आनंद होत आहे. ९ जानेवारी १९७७ रोजी परिषदेची पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेत पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी दे.अ. दाभोळकर होते. याच सभेने परिषदेच्या घटनेला मंजुरी दिली.

डॉ .राहुल शंकरराव म्होपरे

डॉ .राहुल शंकरराव म्होपरे

संपादक - अर्थसंवाद

मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या स्थापनेपासून च (१९७७) अर्थसंवाद या त्रैमासिकाकडे मराठी अर्थशास्त्र परिषदेचा आरसा म्हणून पहिले जाते. अर्थसंवादाला मराठी भाषेतील एक अत्यंत दर्जेदार नियतकालिक म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मान्यता आहे . अर्थसंवाद हे युजीसी केअर लिस्ट व तज्ञ परीक्षित नियतकालिक (UGC Care List and Peer Reviewed Journal - ISSN 0973-8452) असून....




डॉ. श्री.आ. देशपांडे स्मृती जीवनगौरव

अनु. वष पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे नाव स्थळ
२०१८-१९ डॉ. अ.रा.पडोशी सरदार पटेल महाविद्यालय , चंद्रपूर .दि . १८ नोव्हेबर २०१८
२०१७-१८ प्रा.जश.ना.माने धनाजी नाना महाविद्यालय , फैजपूर जि . जळगाव दि .०४ नोव्हेबर २०१७
२०१६-१७ डॉ. यशवंत रारावीकर जैन गुरुकुल महाविद्यालय , चांदवड जि . नाशिक दि . ०७ नोव्हेबर २०१६
२०१५-१६ डॉ. दि.व्य.जहागीरदार तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय , बारामती दि .१७ नोव्हेबर २०१५
२०१४-१५ डॉ.श्रीनिवास खांदेवाले शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालय , अकोला दि .०८ नोव्हेबर २०१४
२०१३-१४ डॉ. ज. फा. पाटील कै .ना.अ.देशमुख महाविद्यालय ,चांदूरबाजार जि .अमरावती दि . २३ नोव्हेंबर २०१३
२०१२-१३ डॉ. व्यं. सु.पाटणकर पु. आं. नाहाटा महाविद्यालय ,भुसावळ जि.जळगाव दि . २३ नोव्हेबर २०१२

श्रीमती बयाबाई श्रीपतराव कदम महिला ग्रंथ पारितोषिक

अनु. पारितोषिक प्रदान वर्ष ग्रंथाचे शिर्षक लेखकाचे नाव
२०२०-२२ ग्रामीण विकासाची वाटचाल डॉ. कुमुदिनी जोगी (अचलपूर )
२०१९-२० फळ उत्पादनाचे अर्थशास्त्र डॉ. वनिता चोरे (चांदूरबाजार )
२०१५-१६ सहकार डॉ. रूपा शहा ( कोल्हापूर )
२०१४-१५ विदर्भातील आर्थिक व सामाजिक विचार डॉ. संगीता टक्कामोरे (रामटेक)
२०१३-१४ आधारवड कुष्ठरुग्णांचा विदर्भातील कुष्ठरोगी संस्थांचे अध्ययन डॉ. विभा सावरकर(अमरावती)
२०१२-१३ अर्थवेद डॉ.सौ.मुक्ता जहागीरदार (अमरावती )
२००९-१० आर्थिक चिकित्सा डॉ.सौ.मुक्ता जहागीरदार (अमरावती )

स्व. प्रा. भास्कर ढाले स्मृती पुरस्कार
(संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती पदव्युत्तर अर्थशास्त्र विषयात प्रथम)

अनु. वर्ष पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे नाव स्थळ
२०२०-२२ कु.भाग्यश्री संजयराव खेरडे
मु. पो. खैरगाव ता. नरखेड जि. नागपूर
चांदूरबाजार
२०१९-२० कु. अश्विनी पांडुरंगजी भोजने
मोर्शी जि. अमरावती
सोलापूर
२०१८-१९ कु. मनिषा राजेंद्रराव कडू
मु.रोह्नखेडा पो.देवरा ता.जि. अमरावती
चंद्रपूर
२०१७-१८ कु.भावना कोटवानी
अकोला
फैजपूर
२०१६-१७ श्री. अविनाश सुंकरवार
पाटणबोरी जि. यवतमाळ
चांदवड
२०१५-१६ श्री.अमोल सुधाकर चौधरी
वरुड जि. अमरावती
बारामती

कै. ग.प्र.पिंपरकर पारितोषिक

अनु. वर्ष निबंधाचे नाव लेखक
२०२०-२२ शेती व्यवसायातील आर्थिक स्थित्यंतराचा आढावा डॉ. सुनील अण्णा गोरडे, ( कन्नड )
२०१९-२० १.शेती संबधी कालबाह्य कायद्याचा शेतीवरील परिणाम
२. शिवाजी महाराजांचे आर्थिक धोरण
१.डॉ.विकास सुकाळे,नांदेड
२.डॉ.सुदाम कोरडे
२०१८-१९ भारतातील कापसाच्या किमान आधार किमतीचा कापूस उत्पादनावर प्रभाव प्रा. किशोर कदम(मुंबई )
२०१७-१८ - १.डॉ. डी.डी. भोसले २. प्रा. संजय ठिगळे व प्रा. सुभाष दगडे
२०१६-१७ - डॉ. विश्वजित कदम व डॉ. प्रशांत हरमकर
२०१५-१६ स्वातंत्र्यपूर्व प्रबोधन काळातील गोपालकृष्ण गोखले यांच्या योगदानाचा अभ्यास डॉ. मंजुषा मुसमाडे (पुणे )
२०१४-१५ - डॉ. विश्वजित कदम ( नाशिक )
२०१३-१४ संगती आणि विसंगतीसह मौद्रिक व वास्तव क्षेत्राचे सैद्धांतिक विश्लेषण डॉ. प्रशांत हरमकर (अमरावती )

भाऊसाहेब गेनुजी दरेकर पारितोषिक
(पदव्युत्तर अर्थशास्त्र विषयात प्रथम, पुणे )

अनु. वर्ष पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे नाव स्थळ
२०१६-१७ बाळू पुरुषोत्तम पावडे चांदवड
२००७-०८ कु. अर्चना सुदर्शनकुमार चौहान बार्शी
२००६-०७ प्रवीण रमेश पोतदार श्रीरामपूर

डॉ. रविन्द्र सबनीस स्मृती पारितोषिक

अनु. वर्ष लेखाचे शिर्षक लेखक
२०१९-२० Financial Inclusion : Challenges Before Indian Economy डॉ. विजय ककडे(कोल्हापूर )
२०१६-१७ Export performance of MSME sector in the past liberalization era. डॉ.बी.एस. खुरद (राहुरी )
२०११-१२ GATS And Indian Banking Challenges Ahead डॉ.संजय तुपे(नाशिक )
२००८-०९ Development strategies for Indian SMES
Promoting linkages with global trans national corporation
एम.एच.बालसुब्रमन्यम (बेंगलोर )
२००१-०२ मध्यवर्ती बँकेची स्वायत्तता (अर्थसंवाद खंड २४ अंक ३ ऑक्टोबर-डिसेंबर २००० ) शरद शंकर जोशी
२०००-०१ Industrial Growth and structure: Manufacturing sector in Maharashtra (EPW Vol.34. No.3) लक्ष्मन बुरंगे

मो.स.भावे पारितोषिक
(अर्थसंवाद मधील सर्वोत्कृष्ठ लेख)

अनु. वर्ष लेखाचे शिर्षक लेखक
२०२०-२२ 1. भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर ?
2. महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणावरील सार्वजनिक खर्च व शालेय शिक्षण प्रगती विश्लेषण
डॉ. अमृता सूर्यवंशी
डॉ. सुभाष कोंबडे
२०१९-२० 1. सौर शेतीची भारतातील प्रगती व भविष्यकाळ
2. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासातील स्त्री शेतमजुराचे योगदान व त्यांच्या समस्या-एक अध्ययन
डॉ. संतोष कदम
डॉ. नीता वाणी
२०१८-१९ १.नोबेल वर्तनवादी अर्थशास्त्राचे आयोजन आणि मर्यादा
२.पर्यटन क्षेत्र आणि भारतीय अर्थव्यवस्था
डॉ. मंजुषा मुसमाडे
डॉ. दिपक भुसारे
२०१७-१८ ७३ व्या घटना दुरुस्ती अंतर्गत वित्तीय स्वायत्तता व ग्रामपंचायतीची कामगिरी डॉ. माधव शिंदे
प्रा. गणेश पोटे
२०१६-१७ ग्रीक शोकांतिका डॉ. विश्वजित कदम
२०१५-१६ महाराष्ट्रातील दारिद्रय : एक अभ्यास डॉ.वाल्मिक दगडू परहर
२०१४-१५ * प्रा. बी.एन. सापनकर
प्रा.एस.एन.साबळे
२०१३-१४ पुणे जिल्ह्यातील आदिवासी महिला बालकुपोषण डॉ. तानाजी गिते
२०१२-१३ वैश्विक भूक निर्देशांक आणि भारत प्रा.नंदकुमार मेटे
१० २०११-१२ सातारा जिल्ह्यातील सौरऊर्जा उपकरणांच्या घरगुती वापरासंबंधीच्या बाजारपेठेचे सॉट विश्लेषण प्रा. उदय लोखंडे
११ २०१०-११ कृषी विकासाचे शाश्वत (चिरंतन) विकृतीकरण –महाराष्ट्राचा ऊसपीक पट्ट्यातील संसाधनांचे विद्रुपीकरण डॉ. वसंतराव जुगळे
१२ २००९-१० किनवट तालुक्यातील आदिवासी उप-योजना डॉ. मारोती तेगमपुरे ( कार्यवाह-खजिनदार)
१३ २००८-०९ नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण समस्या व उपाय प्रा. राजेंद्र के.शिंदे
डॉ. रा.ना.भालेराव
१४ २००७-०८ ऊसाचे दरयुद्ध-काल्पनिकता आणि वास्तविकता डॉ. वसंतराव जुगळे
१५ २००६-०७ गरिबी निर्मुलन आणि आर्थिक विकास २१ व्या शतकासांठी नवीन प्रतिमान डॉ. वसंत पेठे
१६ २००४-०५ महाराष्ट्र राज्याची दयनीय आर्थिक स्थिती प्रा. बी.एस.म्हस्के
१७ १९९९-२००० एका शेतकऱ्यांचे गणित डॉ.सु.गो.भानुशाली
डॉ. अण्णासाहेब गुरव
१८ १९९८-९९ अमर्त्यकुमार सेन यांचे अर्थशास्त्र डॉ. शरद शंकर जोशी
१९ १९९७-९८ महाराष्ट्रातील सिंचनाच्या पाण्याची दर आकारणी : एक आढावा डॉ. र.पु.कुरुलकर
२० १९९६-९७ १९३१-३९ मध्ये हिंदुस्थानातून झालेली सोन्याची अभूतपूर्व निर्यात आणि त्यासंबंधी हिंदी अर्थशास्त्रज्ञांत झालेला वादविवाद डॉ. नी.वि.सोवनी
२१ १९९५-९६ भारताची राजकोषीय तुट डॉ.शर्मिष्ठा सातव- मतकर
२२ १९९४-९५ भारताचे पैसाविषयक धोरण डॉ.विकास चित्रे
२३ १९९३-९४ महाराष्ट्रातील ऊस तोडणी व ऊस वाहतूक कामगार डॉ.वसंतराव जुगळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
सर्वोत्कृष्ठ ग्रंथ पारितोषिक

अनु. वर्ष ग्रंथाचे शिर्षक लेखक
२०२०-२२ अर्थसंभ्रम डॉ.ज.फा.पाटील
२०१९-२० अर्थचिंतन डॉ. प्रशांत हरमकर
२०१८-१९ लेखाजोखा डॉ. रूपा शहा
२०१७-१८ सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र /td> डॉ.एन.एल.चव्हाण
२०१५-१६ भारतातील आधुनिक वित्तीय व्यवस्था डॉ. एम.यु.मुलाणी
२०१४-१५ अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राचार्य बी.एस.काळे
२०१३-१४ अमरावती जिल्ह्यातील नागरीकरणाचे स्वरूप व समस्यांचे विश्लेषण डॉ. जे.व्ही.गायकवाड
२०१२-१३ कादंबरी आणि अर्थकारण डॉ.तेजस्विनी मुडेकर
२०११-१२ आदिवासी समाजातील बाल मृत्यूची समस्या डॉ. जयवंत इंगळे
१० २०१०-११ १.आदिवासी विकास आणि वास्तव
२.आदिवासींची आर्थिक आणि सामाजिक स्थिती
१.डॉ. मारोती तेगमपुरे ( कार्यवाह-खजिनदार)
२.डॉ. जयवंत इंगळे
११ २००९-१० अल्पबचत नियोजन (बचत गट) डॉ. एम.यु.मुलाणी
१२ २००८-०९ भारताचा भविष्यवेध-नव्या अर्थ नितीचा शोध-बोध प्रा.पी.आर.जोशी
१३ २००७-०८ अर्थकारण डॉ.ज.फा.पाटील
१४ २००६-०७ आनंदवन प्रकल्पाची यशोगाथा-सामाजिक व आर्थिक विकासाची डॉ. अरुणा सोनेगावकर
१५ २००१-०२ अर्थतरंग डॉ.ज.फा.पाटील
१६ १९९९-२००० आर्थिक सुधारणांचे नवे पर्व सी.प.खेर
१७ १९९७-९८ क्रांतीकारी अर्थशास्त्रज्ञ जॉनमेंनॉर्ड केन्स सी.प.खेर
१८ १९९६-९७ अभिजात अर्थशास्त्र आणि राज्य हस्तक्षेप नीती डॉ. मुक्ता जहागीरदार
१९ १९९५-९६ नवसनातनवाद आणि आधुनिक भारत गोपाळ राठी
२० १९९३-९४ वेतन सिद्धांत डॉ.ज.फा.पाटील, डॉ.वि.ब.ककडे
२१ १९९०-९१ अर्थसिद्धांत : चुकीचे आणि चकवे डॉ.नी.वि.सोवनी
२२ १९८९-९० गोष्ट पैसा फंडाची भा.रा.साबडे
२३ १९८७-८८ पैसावाद की केन्सवाद सी.प.खेर
२४ १९८५-८६ दास कॅपिटल : सुबोध परिचय सुहास परांजपे
२५ १९८२-८३ साफा विचारसरणी डॉ.नी.वि.सोवनी

प्रा.ज.फा.पाटील पारितोषिक

अनु. वर्ष शोधनिबंध विषय लेखक
२०२०-२२ अण्णा भाऊ साठे यांचे आर्थिक विचार सचिन कुंभार
२०१९-२० १.आंतरराष्ट्रीय शेतीकरार-आव्हाने आणि संधी
२.छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक धोरण
म.तू.शेटे
सचिन कुंभार
२०१८-१९ 1. कार्ल मार्क्स आणि भौतिकवाद
2. चाकण औद्योगिक वसाहतीमधील ऑटोमोबाईल उद्योगाचा सामाजिक संरचनेवर झालेला परिणाम
डॉ. प्राजक्ता पोहरे
उमेश भोकसे
२०१६-१७ * कु. योगिता क्षिरसागर
२०१५-१६ भारतीय नियोजनात औद्योगिक विकासाबाबत नेहरूंचे योगदान डॉ. सोनल जनबंधू
२०१४-१५ * उमेश घोडेस्वार
२०१३-१४ * रमजान मुजावर
२०१२-१३ * प्रा. नीता यादव
२०११-१२ भारतीय स्त्रियांची वंचितता अधोरेखित करणारा निर्देशांक G-II कु. आश्लेषा कुलकर्णी
१० २०१०-११ महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल रमजान मुजावर
११ २००९-१० भारतीय शेती आणि पाणी व्यवस्थापन रमजान मुजावर
१२ २००७-०८ 1. महाराष्ट्रातील नागरीकरण-प्रवृत्ती,कारणे,परिणाम आणि आव्हाने
2. कायदा आणि अर्थशास्त्र
१.प्रा.आर.एस.सोळुंके, जी.बी. गावंडे
२. प्रा. अतुल देशपांडे
१३ २००६-०७ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे आर्थिक विचार धनाजी मोहन पवार

पद्मजा गंधे पारितोषिक
(महिलाकरिता-अधिवेशनात सादर शोधनिबंध)

अनु. वर्ष पारितोषिक प्राप्त व्यक्तीचे नाव शोधनिबंधाचे शिर्षक
२०२०-२२ डॉ. वैशाली ल. देशमुख-नाईक अभिजित बॅनर्जीची दारिद्रयाबाबतची भूमिका व वास्तविकता
२०१९-२० डॉ. प्राची देशपांडे
डॉ. राजश्री रायभोग
स्वराज्याची स्थापना,राज्याभिषेक व कल्याणकारी दृष्टीकोन
महात्मा गांधींच्या विचारातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू व्यक्ती विकास
२०१८-१९ डॉ. उषा पाटील कार्ल मार्क्सच्या वादळी विचारांचा उहापोह
२०१७-१८ डॉ.विद्या पाटील रिकार्डो यांचे आर्थिक सिद्धांत
२०१६-१७ डॉ. तेजस्विनी मुडेकर आर्थिक सुधारणांच्या पार्श्वभूमीवर करार शेतीची गरज
२०१५-१६ डॉ. तेजस्विनी मुडेकर भारतीय आर्थिक नियोजन आणि पंडित नेहरू यांच्या विचाराचा प्रभाव
२०१४-१५ डॉ. धनश्री महाजन महाराष्ट्रातील नोंदणीकृत कारखान्यातील रोजगार एक विश्लेषण
२०१३-१४ डॉ.वनिता चोरे *
२०१२-१३ अपर्णा कुलकर्णी *
१० २०११-१२ डॉ.युगंधरा टोपरे प्रा. जगदीश भगवती यांचे जागतिकीकरणाबाबतचे विचार
११ २०१०-११ डॉ. कुंदा दामले पॉल सॅम्यूअलसन यांचे आंतरराष्ट्रीय व्यापर सिद्धांतातील योगदान
१२ २००९-१० कु.होनाश्री यशवंत पाटील
कु.ज्योती किरवे
का जगावे भारतीय शेतकऱ्यांनी?
महाराष्ट्रातील औद्योगिक विकास
१३ २००८-०९ डॉ. मंजुषा मुसमाडे सर्वसमावेशक वृद्धी अंतर्गत कल्याणकारी राज्य संकल्पना आणि वास्तव
१४ २००७-०८ प्रा. मुक्ता जहागीरदार
प्रा. शकुंतला पाटील
जागतिक व्यापार व्यवस्थेची उदिष्ट्ये व वास्तवातील विसंगती- भारतीय कृषी क्षेत्रावरील अरिष्टे
महाराष्ट्रातील नागरीकरणाचे पर्यावरणीय परिणाम
१५ २००६-०७ कु.पूनम जाधव ,कु. विद्या सुतार कराड खराडी गावातील स्वंयसाह्यता बचतगट-एक व्यष्टी अभ्यास

वार्षिक अधिवेशन, अध्यक्ष, स्‍थळ, दिनांक आणि

अध्यक्षीय भाषण तथा चर्चासत्राचे विषय

अ.क्र. वार्षिक अधिवेशन अधिवेशन दिनांक संस्‍था व ठिकाण अधिवेशनाचे अध्यक्ष अध्यक्षीय भाषणाचा विषय चर्चासत्राचे विषय
पहिले २५ व २६ नोव्‍हें. १९7७ पोदार वाणिज्‍य आणि अर्थशास्‍त्र महाविद्यालय, मुंबई. प्रा.नी.वि. सोवनी, पुणे मराठीतील अर्थशास्‍त्रीय वाङमयः इतिहास, परंपरा,समस्‍या व भावी वाटचाल. १. चलन अतिवृद्धी.
२. महाराष्ट्रातील सरकारची रोजगार हमी योजना.
दुसरे २६,२७ व २८ ऑक्‍टोंबर १९७८ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,नागपूर. प्रा.वि.म. दांडेकर, पुणे भारतीय अर्थव्‍यवस्‍थेतील अंतर्गत वसाहतवाद. १. नफ्याविषयी सिद्धान्‍तन.
२. लोकसंख्या आणि आर्थिक विकास.
३. महाराष्ट्रातील एकाधिकार कापूस खरेदी योजना.
तिसरे २६,२७ व २८ ऑक्‍टोंबर १९७९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. डॉ.श्री.आ. देशपांडे, नागपूर ग्रामीण विकासाच्‍या समस्‍या. १. अर्थशास्‍त्रातील खंड सिद्धांन्‍तन.
२. महाराष्ट्रातील प्रादेशिक विकास व नियोजन.
३. महाराष्ट्रातील शासकीय उद्योग व उपक्रम यांचे व्‍यवस्‍थापन व प्रश्न.
४. अर्थशास्‍त्रीय मराठी परिभाषा.
चवथे ३१ ऑक्‍टोबर, १ व २ नोव्‍हेंबर १९८० श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्‍थेचे महाविद्यालय, धुळे. डॉ.वि.वि. बोरकर, औरंगाबाद महाराष्ट्रातील आर्थिक विकास आणि सामाजिक न्‍याय. १. अर्थशास्‍त्रातील समतोलाची संकल्‍पना.
२. महाराष्ट्रातील शेतीमालाच्‍या विनियमित बाजारपेठा.
३. भारतातील करव्‍यवस्‍था.
४. महाराष्ट्र शासनाची अल्‍प भू- धारकांसाठीची कर्जमुक्‍ती योजना.
पाचवे १९, २० व २१ नोव्‍हेंबर १९८१ शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापूर. प्रा.या.शि. महाजन, जळगांव भारतातील सरकारी क्षेत्र काही समस्‍या. १. उद्योग संस्‍थाविषयी सिद्धांन्‍तन.
२. भारतातील चलनविषयक धोरण.
३. स्‍वयंसेवी संघटना आणि ग्रामीण विकास.
४. शेतीमालाच्‍या किंमती.
सहावे २५,२६ व २७ नोव्‍हेंबर १९८२ कला, वाणिज्‍य आणि विज्ञान महा. संगमनेर (अहमदनगर). डॉ. आनंद नाडकर्णी, पुणे भारतीय करव्‍यवयस्‍था. १. अर्थशास्‍त्रीय वेतन सिद्धांन्‍तन,
२. भारताच्‍या परकीय चलनसंचयाचे प्रश्न.
३. केंद्र-राज्‍य वित्तीय संबंध.
४. भारताच्‍या आर्थिक धोरणातील अलीकडील बदलाचा अन्‍वयार्थ.
सातवे २८,२९ व ३० ऑक्‍टोंबर १९८३ श्रीमती ना.दा. ठाकरसी विद्यापीठ, पुणे येथील महाविद्यालय. डॉ. स.ह. देशपांडे, मुंबई मार्क्सवाद आणि सामाजिक न्‍याय. १. कार्ल मार्क्स यांचे अर्थशास्‍त्र.
२. भारतातील औद्योगिक संरचना.
३. सहकाराचे तत्‍वज्ञान आणि महाराष्ट्रातील सहकारी चळवळ.
४. ग्रामीण भागातील स्‍वयंसेवी संस्‍था.
आठवे ७,८ व ९ डिसेंबर १९८४ श्री स्‍वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबेजोगाई, जि. बीड. डॉ.वि.बा. घुगे, कोल्‍हापूर भारतातील भावफुगवटा. १. केन्‍स यांचे अर्थशास्‍त्र आणि त्‍यानंतर.
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्‍यांचे आर्थिक विचार.
३. महाराष्ट्रातील नागरीकरण आणि त्‍याच्‍या समस्‍या.
४. महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल.
नववे १,२ व ३ नोव्‍हेंबर १९८५ पदव्‍युत्तर शिक्षण व संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठ, रामनाथी देवस्‍थान, फोंडा गोवा. डॉ.ह.कृ. परांजपे, पुणे भारतीय नियोजनातील दिशाबदल इष्ट आहे का? १. अर्थशास्‍त्रः व्‍याख्या व व्‍याप्‍ती.
२. महाराष्ट्रातील कृषी उत्‍पादनाच्‍या समस्‍या.
३. गोव्‍याचा आर्थिक विकास व नियोजन.
४. भारताची सातवी पंचवार्षिक योजना.
१० दहावे २५,२६ व २७ ऑक्‍टोंबर १९८६ श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला. डॉ. रविन्‍द्र स. सबनीस, मुंबई भारतातील पैशाविषयीचे धोरण. १. सनातन अर्थशास्‍त्रातील विचार आणि आर्थिक विकास.
२. भारताचे राष्ट्रीय उत्‍पन्‍नः संकल्‍पना आणि मापन.
३. महाराष्ट्रातील वस्‍त्रोद्योग समस्‍या.
४. महाराष्ट्रातील जलसिंचनाच्‍या समस्‍या व पाणी वाटपाविषयी शासकीय धोरण.
११ अकरावे १,२,३ व ४ जानेवारी १९८८ रयत शिक्षण संस्‍था यशवंतराव चव्‍हाण प्रतिष्ठान धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय, सातारा. डॉ. गि.सो. कल्‍याणकर, औरंगाबाद भारताचा परकीय व्‍यापार आणि व्‍यापारविषयक धोरण. १. समाजवादी अर्थव्‍यवस्‍थेतील आर्थिक नियोजन आणि त्‍यातील बाजार व्‍यवस्‍था.
२. नाका कर.
३. महाराष्ट्रातील अर्थशास्‍त्र अध्यापनाच्‍या समस्‍या.
४. महाराष्ट्रातील दुष्काळ व त्‍याचे निवारण.
५. कर्मवीरांची स्‍वावलंबी शिक्षणयोजना.
१२ बारावे २५,२६ व २७ नोव्‍हेंबर १९८८ साहित्‍य, विज्ञान आणि वाणिज्‍य महाविद्यालय शहादा, जि. नंदूरबार. प्रा.सौ.नलिनी पंडित, मुंबई स्‍त्रिया आणि आर्थिक विकास. १. शिक्षणाचे अर्थशास्‍त्र.
२. भारतातील भांडवल बाजाराचे बदलते स्‍वरुप.
३. महाराष्ट्रातील साखर उद्योग.
४. मोठ्या धरणांचे सामाजिक व आर्थिक परिणाम.
१३ तेरावे ९,१० व ११ नोव्‍हेंबर १९८९ गोविंदराम सेक्‍सरिया अर्थ वाणिज्‍य महा. नागपूर. डॉ. रविन्‍द्र दोशी, कोल्‍हापूर महाराष्ट्रातील कृषी विपणन व्‍यवस्‍था. १. सार्वजनिक खर्चाचे सिद्धांन्‍तन.
२. भारतातील दारिद्रय निवारणाच्‍या योजनांचे मुल्‍यमापन.
३. महाराष्ट्रातील दुग्‍ध व्‍यवसाय.
४. केंद्र व राज्‍य वित्तीय संबंध व पंचायत राज्य विधेयक.
१४ चौदावे १०,११ व १२ नोव्‍हेंबर १९९० सोलापूर जिल्‍हा अर्थशास्‍त्र अध्यापक समिती व भारती विद्यापीठ इस्‍टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सोलापूर. डॉ. श्रीनिवास वि. खांदेवाले, नागपूर जर्मनीचे एकीकरण १९९० युरोपचा एकच बाजार १९९२ १. आंतरराष्ट्रीय व्‍यापार आणि आर्थिक विकास.
२. भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेतील नियोजन काळातील संरचनात्‍मक बदल.
३. महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँका: स्‍वरुप आणि समस्‍या.
४. भारताच्‍या अर्थव्यवस्‍थेत रोजगार निर्मितीची शक्‍यता व समस्‍या.
१५ पंधरावे २९,३० नोव्‍हेंबर व १ डिसेंबर १९९१ प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड. डॉ.ज.फा. पाटील, कोल्‍हापूर तुटीचे (अन) अर्थकारण भारताच्‍या राजकोषीय व्‍यवहाराचे एक विश्लेषण. १. पैसाविषयक सिद्धांतातील आधुनिक प्रवाह.
२. भारतातील अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांच्‍या समस्‍या. ३. महाराष्ट्र आणि गोवा
राज्‍यातील पर्यटन व्‍यवसाय. ४. भारताचे नवे औद्योगिक धोरण.
१६ सोळावे २५,२६ व २७ डिसेंबर १९९२ के.टी.एच.एम. कॉलेज नाशिक. डॉ. शशिकांत गंधे, नवी दिल्‍ली लोकसंख्या आणि आर्थिक अभिवृद्धी. १. कल्‍याणाच्‍या अर्थशास्‍त्रातील आधुनिक विचार.
२. भारतातील ग्रामीण औद्योगिकरण.
३. महाराष्ट्रातील फलोद्यान व्‍यवसायाचे अर्थशास्‍त्र.
४. देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेत अर्थसाहाय्याचे योगदान.
१७ सतरावे २७,२८ व २९ नोव्‍हेंबर १९९३ लठ्ठे एज्‍युकेशन सोसायटी सांगली. डॉ.व्‍यं.सु. पाटणकर, धुळे भारतातील परिवहन विकास आणि धोरण. १. उपभोक्‍त्‍याच्‍या वर्तनाचे आर्थिक सिद्धांतन.
२. भारताची करव्‍यवस्‍था.
३. महाराष्ट्रातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्‍था.
४. डंकेल प्रस्‍ताव आणि भारत.
१८ अठरावे २,३ व ४ जानेवारी १९९५ दि. साऊथ कोकण एज्‍युकेशन सोसायटी, बेळगांव. डॉ.के.जी. पठाण, पुणे आंतरराष्ट्रीय व्‍यापार आणि भारतीय कृषी अर्थव्‍यवस्‍थाः संरक्षणवादी नीतीपासून उदारीकरणापर्यंत वाटचाल. १. पर्यावरणाचे अर्थशास्‍त्र. २. भारतीय रुपयाची परिवर्तनीयता.
३. पश्चिम घाट विकास योजना.
४. महाराष्ट्रातील वैधानिक विकास मंडळे.
५. भारतातील खाजगीकरणाचे धोरण.
१९ एकोणिसावे ४,५ व ६ नोव्‍हेंबर १९९५ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे. प्रा.शि.ना. माने, सातारा भारतातील ऊस किंमत धोरण (ऊसाच्‍या किंमतीचे धोरणाभिमुख अर्थशास्‍त्र). १. आंतरराष्ट्रीय व्‍यापाराच्‍या सिद्धांतातील नवे प्रवाह.
२. भारतातील वित्तीय क्षेत्रातील सुधारणा.
३. महाराष्ट्रातील अर्थशास्‍त्राचे विद्यापीठीय अभ्यासक्रम सुधारणा आणि पुनर्रचना.
४. महाराष्ट्र राज्‍याची झुणका- भाकर योजना: उत्‍पत्ती, प्रयोजन, प्रश्न व पर्याय.
२० विसावे १७,१८ व १९ नोव्‍हेंबर १९९६ प्रताप कॉलेज, अमळनेर. डॉ.भ.ग. बापट, पुणे आंतरराष्ट्रीय पैसाः काल, आज आणि उद्या. १. एकोणीसाव्‍या शतकातील आर्थिक उदारमतवाद आणि तत्‍कालीन भारतीय अर्थशास्‍त्र.
२. भारतीय अर्थव्‍यवस्‍थेतील महिलांचे स्‍थान.
३. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्‍याचे अर्थशास्‍त्र.
४. छोटी राज्‍ये व त्‍यांची स्‍वयंनिर्वाहता.
२२ बाविसावे १३,१४ व १५ नोव्‍हेंबर १९९८ शासकीय विदर्भ महाविद्यालय, अमरावती. डॉ.र.पु. कुरुलकर, औरंगाबाद महाराष्ट्र राज्‍यातील प्रादेशिक असमतोलः समस्‍या आणि उपाय. १. आंतरराष्ट्रीय वित्तीय व्‍यवस्‍थेचे बदलते स्‍वरुप.
२. भारतातील बेकारीची समस्‍या.
३. महाराष्ट्रातील कर्ज समस्‍या.
४. दक्षिण-पुर्व आशियातील चलनसंकट व भारत.
२३ तेविसावे १६,१७ व १८ नोव्‍हेंबर १९९९ गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्‍नागिरी. डॉ.सु.दा. तुपे, पुणे महाराष्ट्रातील साखर उद्योग स्‍थिती व समस्‍या. १. वि.म. दांडेकर यांचे अर्थिक विचार.
२. भारतातील शेतीमालाचे विपणन.
३. महाराष्ट्रातील आधारभुत संरचनाः सद्यःस्‍थिती व भविष्यातील वाटचाल.
४. कोकणच्‍या आर्थिक विकासाच्‍या समस्‍या.
२४ चोविसावे ५,६ व ७ नोव्‍हेंबर २००० कन्‍या महाविद्यालय, मिरज, जि. सांगली. डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुंबई स्‍वातंत्र्योत्तर भारताच्‍या आर्थिक विकासाचे राजकीय अर्थशास्‍त्र. १. केन्‍सनंतरचे अर्थशास्‍त्र.
२. जागतिकीकरणाचे धोरण व भारतीय अर्थव्‍यवस्‍थेतील बदल.
३. महाराष्ट्रातील ग्रामीण विकेंद्रीकरण.
४. आर्थिक विकासाची पर्यायीनीती.
२५ पंचविसावे ५,६,७ व ८ नोव्‍हेंबर २००१ महात्‍मा फुले कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय, पनवेल. डॉ.अ.रा. पडोशी, गोवा नवीन आर्थिक धोरण यशस्‍वी होण्यासाठी प्रथम दारिद्रय निर्मुलन करणे आवश्यक. १. महात्‍मा फुले यांचे आर्थिक- सामाजिक विचार.
२. भारतातील सेवा क्षेत्र - बदलते स्‍वरुप व परिणाम.
३. महाराष्ट्रातील सामाजिक सेवा.
४. आगामी कालामध्ये सरकारी
क्षेत्रातील वस्‍तु व सेवा यांचे किंमत निर्धारण.
५. भारतापुढील आर्थिक आव्‍हाने.
६. मराठी अर्थशास्‍त्र परिषदेची वाटचाल.
२६ सव्‍वीसावे १७,१८ व १९ नोव्‍हेंबर २००२ वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथ. डॉ. संतोष दास्‍ताने, पुणे उच्‍च शिक्षणाचे अर्थशास्‍त्र. १. अल्‍पजनाधिकार व धूत सिद्धांत.
२. भारतातील अन्‍न सुरक्षितता.
३. महाराष्ट्रातील जलसिंचन आयोगाचा अहवाल-मुल्‍यमापन.
४. महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँका समस्‍या आणि उपाय.
२७ सस्त्ताविसावे २३,२४ व २५ नोव्‍हेंबर २००३ सोनोपंत दांडेकर कला महाविद्यालय, पालघर. डॉ. सुर्यकांत जगदाळे, वाशी, उस्‍मानाबाद महाराष्ट्राच्‍या आर्थिक विकासाचे राजकीय अर्थशास्‍त्र. १. माहितीचे अर्थशास्‍त्र.
२. खाजगीकरण व निर्गुंतवणुकीकरण.
३. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे आर्थिक व सामाजिक विचार.
४. कॅनकून मंत्री परिषद व भारत.
२८ अठ्ठविसावे २६,२७ व २८ नाव्‍हेंबर २००४ मूळजी जेठा महाविद्यालय, जळगांव खान्‍देश. डॉ. मधुकर शिंदे, इस्‍लामपूर, सांगली मूल्‍यवर्धीत कर. १. विनिमय दर सिद्धांत आणि व्‍यवहार.
२. भारतीय शेतीची आंतरराष्ट्रीय स्‍पर्धात्‍मकता.
३. महाराष्ट्रातील मानवी विकासाची वास्‍तविकता.
४. शेतक-यांच्‍या वाढत्‍या आत्‍महत्‍या शोध, बोध आणि उपाय.
२९ एकोणतिसा वे २५,२६ व २७ नोव्‍हेंबर २००५ कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय, बारामती, जि. पुणे. डॉ. सर्जेराव ठोंबरे, औरंगाबाद ग्रामीण विकास. १. सामाजिक, आर्थिक निवडीचे सिद्धांतन.
२. भारतीय घटकराज्‍यांची ऋणग्रस्तता.
३. महाराष्ट्रातील जिल्‍हा नियोजन.
४. जैवतंत्रज्ञानाचे आर्थिक व सामाजिक परिणाम.
३० तिसावे २६,२७ व २८ नोव्‍हेंबर २००६ रा.ब. नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर प्रा. दिलीप कदम, पुणे जागतिकीकरण व भारताच्‍या शिक्षण क्षेत्रातील आर्थिक आव्‍हाने १. भारतातील आर्थिक विचारांचा विकास.
२. भारतातील स्‍वयंसहाय्यता गट पार्श्वभूमी व वाटचाल.
३. महाराष्ट्रातील आदिवासी भागातील कुपोषण समस्‍या व उपाय.
४. लोकोपयोगितांचे खाजगीकरण प्रश्न व पर्याय.
३१ एकतिसावे २,३ व ४ नोव्‍हेंबर २००७ श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी, जि. सोलापूर. प्रा. पी.बी. कुलकर्णी, पलुस, जि. सांगली विशेष आर्थिक परिक्षेत्रे (सेझ) १. कायदा आणि अर्थशास्‍त्र.
२. भारताच्‍या कृषी क्षेत्रावरील अरिष्टे.
३. महाराष्ट्रातील नागरीकरण कारणे, स्‍वरुप आणि परिणाम.
४. कोरडवाहू शेती आणि जैवतंत्रविज्ञान.
३२ बत्तिसावे ७,८ व ९ नोव्‍हेंबर २००८ मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्‍या महाविद्यालय, कडेगांव, जि. सांगली. डॉ. विनायक भिसे, औरंगाबाद हवामान साक्षरता. १. सर्वसमावेशक वृद्धीचे सैद्धांतिक विवेचन.
२. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाः स्‍वरूप, उपयुक्‍तता आणि भवितव्‍य.
३. १९९० नंतरचे महाराष्ट्राच्‍या अर्थसंकल्‍पाचे बदलते स्‍वरुप.
४. सहकारी पतसंस्‍थेची पुनर्रचना.
३३ तेहतिसावे १३,१४ व १५ जानेवारी २०१० शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, बारामती, जि. पुणे. डॉ. विनायक देशपांडे, नागपूर जागतिक वित्तीय अरिष्टांचे सैद्धांतिक व व्‍यावहारिक दृष्टीकोन. १. पॉल क्रूगमन यांचे आंतरराष्ट्रीय व्‍यापार सिद्धांतातील योगदान.
२. भारतीय शेती समोरील आव्‍हाने.
३. महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचे मूल्‍यमापन.
४. महाराष्ट्राची अर्थव्‍यवस्‍था सुवर्ण महोत्‍सवाच्‍या उंबरठ्यावर.
५. महाराष्ट्रातील स्‍वयं-सहाय्यता बचत गटाची सद्यःस्‍थिती व भवितव्‍य.
३४ चौतिसावे १३,१४ व १५ नोव्‍हेंबर २०१० आदर्श कला व वाणिज्‍य महाविद्यालय, बदलापूर, जि. ठाणे. डॉ. सौ. मुक्‍ता जहागिरदार, अमरावती परामर्श विकासाचाः परिप्रेक्ष्य अपवर्जन व समावेशनाचा . १. पॉल सॅम्‍युअलसन यांचे अर्थशास्‍त्रातील योगदान.
२. असंघटीत क्षेत्रातील श्रमिकांचा अभ्यास.
३. महाराष्ट्राच्‍या आर्थिक प्रगतीचे वास्‍तव आणि भवितव्‍य.
४. १३वा वित्त आयोग.
३५ पस्‍तीसावे ७,८ व ९ नोव्‍हेंबर २०११ पीपल्‍स कॉलेज, नांदेड. प्राचार्य डॉ. आ.गो. पुजारी, सांगोला, जि. सोलापूर महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी पाण्याचा इष्टतम वापर. १. प्रा. जगदीश भगवती यांचे अर्थशास्‍त्रातील योगदान.
२. भारतीय अर्थ व्‍यवस्‍थेची आर्थिक महासत्ता बनवण्याकडे वाटचाल.
३. ग्रामीण महाराष्ट्रातील आधारभुत संरचना.
४. महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक.
३६ छतीसावे २२,२३ व २४ नोव्‍हेंबर २०१२ भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्‍य महाविद्यालय, भुसावळ जि. जळगांव. डॉ.के.के. पाटील, परभणी भारतीय बँकींग - एक दृष्टीक्षेप. १. जोसेफ स्‍टिगलीश यांचे अर्थशास्‍त्रील योगदान.
२. भारतातील भाववाढीची चिकित्‍सा.
३. महाराष्ट्राचे जलधोरण.
४. दारिद्रय रेषेची वास्‍तविकता.
३७ सदोतिसावे २२,२३ व २४ नोव्‍हेंबर २०१३ कै. नारायणराव अमृतराव देशमुख महाविद्यालय, चांदुरबाजार, संगीतसुर्य केशवराव भोसले सभागृह अमरावती. प्राचार्य डॉ. जे.एस, पाटील, सातारा महात्‍मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - एक चिकित्‍सा. १. मुक्‍त आंतरराष्ट्रीय व्‍यापाराच्‍या संदर्भात विषमता व दारिद्रय याबाबत सैद्धांतिक विवेचन.
२. विदेशी गुंतवणूकीचा भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील परिणाम.
३. महाराष्ट्रातील सहकारी चळवळः सद्यःस्‍थिती व भवितव्‍य.
४. उर्जेचे अर्थशास्‍त्र.
३८ अडतिसावे ७,८ व ९ नोव्‍हेंबर २०१४ श्री. शिवाजी कला, वाणिज्‍य विज्ञान महाविद्यालय, अकोला. डॉ. श्रीराम जोशी, जळगांव भारतातील आर्थिक विषमता आणि दारिद्रय राज्‍यस्‍तरीय विश्लेषण. १. मौद्रिक क्षेत्र व वास्‍तव क्षेत्र या दोहोतील विसंगतीचे सैद्धांतिक विवेचन.
२. जैव तंत्रज्ञान, पर्यावरण आणि भारतीय शेतीची वाटचाल.
३. महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल सद्यःस्‍थिती व आव्‍हाने.
४. दुष्काळ कारणे व उपाय.
३९ एकोणचाळी सावे १६,१७ व १८ नोव्‍हेंबर २०१५ तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती जि. पुणे. डॉ. सुहास आव्‍हाड, संगमनेर स्‍वातंत्र्योत्तर भारतातील विदेशी गुंतवणूक. १. गोपाळ कृष्ण गोखले यांचे आर्थिक विचार.
२. पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारतातील आर्थिक नियोजन.
३. महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्‍या योजना व त्‍याची फलश्रृती.
४. महाराष्ट्रातील नागरीकरणा पुढील नवी आव्‍हाने.
४० चाळीसावे ६,७ व ८ नोव्‍हेंबर २०१६ श्री. नेमिनाथ जैन ब्रम्‍हचर्याश्रम (जैन गुरुकुल) संचालित कर्मवीर केशवलालजी खरकचंदजी आबड कला, श्रीमान मोतीलालजी गिरधारीलालजी लोढा वाणिज्‍य व श्रीमान पी.एच. जैन विज्ञान (वरिष्ठ) महा. नेमिनगर, चांदवड जि. नाशिक. डॉ.एस.एम. भोसले, सातारा महाराष्ट्रातील जलसिंचनः एक चितंन. १. प्रा.नी.वि. सोवनी यांचे आर्थिक विचार.
२. आर्थिक सुधारणा आणि भारतीय शेती.
३. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण्यासंदर्भात शासनाची भूमिका.
४. मेक इन इंडिया.
४१ एकेचाळीसा वे ३,४ व ५ नोव्‍हेंबर २०१७ धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, जि. जळगांव (खान्‍देश). डॉ. रामचंद्र रसाळ, लोणी (खु.) प्रवरानगर महाराष्ट्रातील शेतीः आव्‍हाने आणि संधी. १. रिकार्डो यांचे आर्थिक सिद्धांत.
२. भारतातील करव्‍यवस्‍थेतील बदलांचा चिकित्‍सक अभ्यास.
३. महाराष्ट्राच्‍या जडणघडणीत वसंतदादा पाटील यांचे योगदान.
४. नोटा बंदीचे अर्थशास्‍त्र.
४२ बेचाळीसावे १७,१८ व १९ नोव्‍हेंबर २०१८ सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर. प्रा. चारूदत्त गोखले सेवा क्षेत्र आणि महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ. १. कार्ल मार्क्स काल, आज आणि उद्या.
२. कृषीमूल्‍य व व्‍यय आयोग- एक चिकित्‍सक अध्ययन.
३. महाराष्ट्रातील सामाजिक संरचना सद्यःस्‍थिती व आव्‍हाने,
४. अर्थशास्‍त्राचे मराठीकरण सद्यःस्‍थिती आणि आव्‍हाने.
४३ त्रेचाळीसावे ३१ ऑक्‍टोंबर, १ व २ नोव्‍हेंबर २०१९ अभिजीत कदम इन्‍स्‍टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड सोशल सायन्‍स, सोलापूर. डॉ. रामदास वाय. माहोरे आरोग्‍याचे अर्थशास्‍त्र. १. महात्‍मा गांधीजींच्‍या आर्थिक विचाराची समर्पकता.
२. भारतीय शेतीसंबंधी पारीत करण्यात आलेल्‍या कायद्याचे पुनरार्वलोकन.
३. महाराष्ट्राच्‍या जडणघडणीत छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक योगदान.
४. १४ व्‍यापारी बँकांच्‍या राष्ट्रीयीकरणाचे अर्धशतक आणि सद्यःस्‍थिती.
४४ चौरेचाळीसा वे ११,१२ व १३ मार्च २०२२ गो.सी. टोम्‍पे कला, वाणिज्‍य व विज्ञान महाविद्यालय, चांदूरबाजार जि. अमरावती. डॉ. अनिल सूर्यवंशी कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर भारतातील आरोग्‍य खर्च आणि आरोग्‍य सुविधांचा आढावा. १. नोबेल पारितोषिक प्राप्‍त अभिजीत बॅनर्जी यांचे योगदान.
२. भारतातील वर्तमान दशकातील आर्थिक स्‍थितंतरे.
३. अण्णाभाऊ साठे यांच्‍या साहित्‍यातील आर्थिक दृष्टीकोन.
४. तीन कृषी कायदे, कृषी किंमतीःसैद्धांतिक विश्लेषण.
४५ पंचेचाळीसा वे नोव्हेंबर २०२२ (नियोजीत) जे.ई.एस. महाविद्यालय, जालना. डॉ.आर.बी. भांडवलकर १. आर्थिक सिद्धांतन आणि प्रायोगिक पध्दती.
२. १५वा वित्त आयोगः केंद्र राज्‍य वित्तीय संबंधाची चिकित्‍सा.
३. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे आर्थिक विचार.

X